अंतर्मन - भाग १ : खिशात ४३ रुपयेसकाळचे ८:३९ झाले होते. जग धावत होते. बाहेर गाड्यांचे हॉर्न, ऑफिसचे मेल, आणि लोकांची यंत्रवत गर्दी. पण या सगळ्या गोंगाटात एक आवाज असा असतो जो कोणालाच ऐकू येत नाही. तो आवाज माझ्या आतून येतो. त्याचंच नाव आहे - अंतर्मन.बीडच्या बस स्टँड मागच्या चहाच्या टपरीवर जय उभा होता. टेबलावरच्या स्टीलच्या डब्यात त्याने सुटे पैसे मोजले. एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये... सगळे मिळून ४३ रुपये. ४३ रुपयात आजच्या जगात काय येतं? कदाचित एक चहा आणि एक बिस्कीट. पण जयच्या डोक्यात मात्र ४३०० कोटींचा प्लॅन होता.लोक त्याला वेडा म्हणायचे. "बीडमध्ये राहून कोणी अरबपती होतं का? पुण्याला