भाग १रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या हेडलाईट्सचा पांढराशुभ्र उजेड आणि इंजिनांचा घुमणारा आवाज वातावरण दणाणून सोडत होता.एक-दोन नाही...पंधरा-वीस सुपरबाईक्स रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या.त्यांच्या आसपास जमलेले रायडर्स. कोणी हेल्मेट अॅडजस्ट करत होतं, कोणी ग्लोव्हज चढवत होतं, तर कोणी रेसच्या आधीचा अॅड्रेनालिन रश एन्जॉय करत होतं."आज दमनला हरवायचं आहे."कोणीतरी आत्मविश्वासाने म्हटलं.आजूबाजूचे सगळे हसले.