भाग १"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत."आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली.टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः पसारा झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता."गुन्हा, शिक्षा आणि अपराधभाव : एक मानसशास्त्रीय अभ्यास"शर्वाणीने कपाळ चोळलं."हो आई... पाच मिनिटं."आई तिच्या खोलीत आली. टेबलवरचे कागद बघितले आणि नेहमीसारखीच हसली."हे पाच मिनिटं मागच्या दोन तासांपासून ऐकतेय मी."शर्वाणी हसली."उद्या जेलमध्ये जायचं आहे. पहिल्यांदाच "आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला."झोप आता. उद्या फ्रेश डोक्याने जा."शर्वाणीने मान हलवली. आई आत गेली. पण तिची नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. तिने दस्तऐवज बंद केला आणि बाजूला ठेवलेल्या फाईलकडे हात वाढवला. उद्या भेटायच्या