दैत्य - भाग 2

भाग २     रात्र संपली होती… पण अंबिकाच्या मनातली अस्वस्थता अजूनही जागी होती.पहाटे कधीतरी तिला डोळा लागला होता. पण झोप खोल नव्हती. डोळे मिटले की तीच अरुंद गल्ली समोर उभी राहत होती… पावसाने धुसर झालेल्या भिंती… लालसर पाणी… आणि ते भेदक, थंड, निर्विकार डोळे.अंबिका दचकून जागी झाली.खिडकीतून सकाळचा प्रकाश आत येत होता. रात्रीचा पाऊस थांबला होता. रस्त्यावर पाण्याचे ओघळ चमकत होते. घरात नेहमीची सकाळ सुरू झाली होती. आईने फोडणी घातलेल्या भाजीचा वास… स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज… बाबांनी पेपरची पानं उलटण्याचा आवाज. सगळं नेहमीसारखंच. फक्त तिच्या आत काहीच नेहमीसारखं नव्हतं.ती अंथरुणावर बसून काही क्षण स्थिर राहिली. हात नकळत बोटांकडे गेले. त्या बोटांना