अंतर्मन - भाग २ : पहिला ग्राहक आणि १० रुपयांचा अपमान, भीती आणि विश्वासघात आरशात दिसलेला तो सुटातला माणूस मी नव्हतो. मी होतो फक्त २२ वर्षाचा, बीडच्या लॉजवर राहणारा, खिशात ४३ रुपये असलेला जय.दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, तेच फाटके शूज घातले आणि पुण्याच्या कॅम्प एरियात गेलो. माझ्याकडे प्रॉडक्ट नव्हता, कंपनी नव्हती, फक्त एक कल्पना होती - लोकांना कमी वेळात जास्त काम कसं करता येईल हे शिकवायचं.मी एका दुकानात शिरलो. मालकाला म्हणालो, "सर, मी तुमचा सेल्स २ पट करून देईन, फक्त १० मिनिटे द्या."तो हसला. त्याने खिशातून १० रुपयांची नोट काढली आणि माझ्या हातावर ठेवली."हे घे. तुझ्या मोटिव्हेशनचं पार्सल. जा इथून,