भाग २पावसाने शहराला पुन्हा एकदा वेढलं होतं. रस्त्यावर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि गाड्यांच्या हेडलाईट्स ओल्या रस्त्यावर चमकत होत्या. दमनची काळी सुपरबाईक सिग्नलकडे येऊन थांबली. लाल दिवा लागला होता. त्याने ब्रेक दाबला. इंजिनचा आवाज अजूनही मंदपणे घुमत होता. हेल्मेटच्या व्हायझरवर पावसाचे थेंब जमा झाले होते. त्याने ग्लोव्ज घातलेल्या हाताने ते पुसले. आजूबाजूला गाड्यांची गर्दी होती. कोणीतरी घरी जाण्याच्या घाईत, तर कोणीतरी उशिरा निघाल्याच्या वैतागात. दमन मात्र निवांत उभा होता, सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत.तेवढ्यात त्याची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका कॅबवर गेली. सहज. कसलाही हेतू नसताना. कॅबची काच अर्धी खाली होती. आत एक स्त्री बसली होती. तिच्या एका हातात फोन