रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजले होते. मुंबईचा पाऊस आणि त्या जोरदार सरी, मुंबईचा पाऊस सुरू झाला की रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते, हे कळत नाही. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज कमी झाले होते , पण पूर्णपणे शांत झाली नव्हती. पूर्ण शांत होईल ती मुंबई कसली? कुठेतरी दुरून एखाद्या बाईकचा आवाज यायचा, समोरच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये पानी सांचल्याचा हलका आवाज यायचा आणि मध्येच पावसाचे थेंब खिडकीच्या काचेवर येऊन आपटायचे. आरव खिडकीजवळ बसला होता. मुंबईच्या पावसाचा पुरेपूर आनंद घेत होता. आरव समोर टेबलवर एक काळ्या रंगाची डायरी उघडी होती. डायरी फार महागडी नव्हती आणि नवीन सुद्धा नव्हती. जुनीच होती ती. काळं कवर ,