मोठा माणूससाठ हजार रुपये. माझ्या हातात एवढे पैसे कधीच नव्हते. लॉजच्या त्या छोट्या टेबलवर मी नोटा मोजत होतो आणि राम माझ्याकडे बघत होता, त्याच्या डोळ्यात भीती आणि आनंद दोन्ही होते."भाऊ, आता काय?" राम म्हणाला.मी म्हणालो "आता आपण फक्त दुकानदार नाही, आपण सिस्टम आहोत."पण मला माहिती नव्हतं, बीडमध्ये सिस्टम फक्त एकाच माणसाची चालते.त्याचं नाव भाऊसाहेब.दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचा माणूस आला. काळा शर्ट, गळ्यात सोन्याची चैन. तो लॉजच्या दारात उभा राहून म्हणाला, "भाऊसाहेबांनी बोलावलंय. आत्ताच्या आत्ता."रामचा चेहरा पांढरा पडला. तो म्हणाला "भाऊ नको जाऊ, भाऊसाहेब म्हणजे... तो माणूस चांगला नाही. त्याने मागच्या वर्षी एका पोराचं दुकान बंद पाडलं होतं."मी पिशवीत साठ हजार