: पहिला घातभाऊसाहेब सोबत पार्टनरशिप झाली आणि दुसऱ्या दिवशी आमचं ऑफिस बदललं. त्या छोट्या लॉजमधून आम्ही आता भाऊसाहेबच्या मोठ्या गोडाऊनच्या एका कोपऱ्यात शिफ्ट झालो. रामला तर विश्वासच बसत नव्हता. त्याने नवीन शर्ट घेतला होता."भाऊ, आता आपण मोठे माणसे झालो," राम म्हणाला.मी हसलो. पण माझ्या मनात भीती होती. कारण मोठ्या माणसांच्या शत्रू पण मोठे असतात.पहिल्या दिवशी भाऊसाहेबने मला एक नवीन काम दिलं. तो म्हणाला, "जय, तुझ्या त्या सात दुकानदारांना सांग, आजपासून त्यांना माल मी नाही, तू देशील. पण पैसा माझ्या नावाने गोळा करायचा."मला हे थोडं विचित्र वाटलं, पण मी हो म्हणालो.मी पहिल्या दुकानात गेलो - संजय किराणावाला. तो मला बघून खूप