निषाद पर्व भाग १०अर्जुना, तुझा हा संभावित संधिसाधूपणा लक्षात आल्यावर तुझ्या समोर आऽ वासून राहिलले प्राक्तन ही नियतीची उचित योजना आहे, असे माझे मत बनत चालले आहे. घटनारंभी तुझ्या सारख्या वीराची झालेली गलितगात्र अवस्था पाहून तुझ्यावर अशी वेळ येता कामा नये होती असा विचार माझ्या मनात आला. जनमनातील तुझी प्रतिमा, धनुर्विद्येतील तुझे सामर्थ्य, अक्षरशः पायदळी तुडवून तुला नगण्य ठरवीत दुर्लक्षून, दस्युंनी चालविलेली बेधुंद लुटालूट पाहिल्यावर निर्णयाच्या अंतिम क्षणी तुझ्या सहाय्यार्थ तिरकामठा उचलण्याचा झालेला मोह मलाही आवरता आला नाही. यास्तव माझ्याशी संबंध नसलेल्या घटनेत मी हस्तक्षेप केला." "अर्जुना, या घटनेतील माझा हस्तक्षेप ही तुझ्या