भाग २खोलीचं दार बंद होताच खोलीत शांतता पसरली. श्रीजा दाराजवळच उभी होती. तिची नजर खाली होती. हात अजूनही थरथरत होते. शिवांशने तिच्याकडे पाहिलं."बस."ती बेडच्या एका टोकाला जाऊन बसली. शिवांश टेबलजवळ गेला. जारमधून ग्लासमध्ये पाणी ओतलं. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. "हे घे."श्रीजाने त्याच्या हातातला ग्लास घेतला. पाणी प्यायलं. पण तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. तिची अवस्था पाहून शिवांशने तिच्या खांद्यापर्यंत नेलेला हात पुन्हा मागे घेतला. त्या दोघांमध्ये अजूनही एक अनोळखी अंतर अजूनही होतं. तो काही क्षण शांत होता. मग तिच्याकडे बघून म्हणाला,"श्रीजा.... शांत हो.""गोष्टी अशा घडल्यात की सगळं लगेच सहज स्वीकारलं जाईल असं नाही.""आत्ता जे काही खाली घडलं.... ते मनाला