दुसऱ्या दिवशी सकाळी आरव कॉलेजमध्ये नेहमीपेक्षा दहा पंधरा मिनिट अगोदर पोहोचला...का? कारण तर त्याला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं..कदाचित प्रॉजेक्ट वर काम करायचं होत..कदाचित लेक्चर लवकर असेल...सगळं काही कदाचित.....आरव... पाठीमागून त्याला आवाज आला.आरव पाठीमागे वळला आणि बघू लागला..समीर त्याच्या दिशेने धावत येत होताआज एवढ्या लवकर?हो..कशासाठी? काही खास?लेक्चर आहे..दहा वाजता आहे माहिती आहे...हा मग? आरव ने खांदे उडवत म्हणाला...अरे मग काय? आत्ता किती वाजले?9.45 झाले आहेत..माहिती आहे..समीर दोन सेकंद थांबला..आरव ने त्याच्याकडे बघितला?तुला त्या मुलीला बघायचं आहे ना? समीर ने हसत आरव ला चिडवायला सुरू केलं.आरवाने चेहरा खाली केला आणि म्हणाला कोणती मुलगी?कालची मुलगी....समीर लगेच म्हणाला.मला काय माहिती... आरवला काही माहिती नाही