अंतर्मन - भाग 9

  • 438
  • 156

भाग : दोनशे दुकानांचा प्लॅनकंपनी काढली या आनंदात मी रात्रभर झोपलो नाही. अंतर्मन प्रायव्हेट लिमिटेड. नाव ऐकायला किती भारी वाटत होतं.सकाळी मी ऑफिसला गेलो. अण्णा आधीच बसले होते. त्यांच्यासमोर एक मोठा नकाशा होता - आमच्या शहराचा.अण्णा म्हणाले, "जय, ये."मी गेलो.ते म्हणाले, "हा बघ नकाशा. यात लाल टिक असलेली 200 दुकानं आहेत. ही सगळी दुकानं आमच्या जुन्या एजंटने सोडली आहेत. कारण त्यांच्याकडून उधारी वसूल होत नाही. तुझं काम आहे, पुढच्या 15 दिवसात या 200 दुकानदारांना परत आपल्या सिस्टममध्ये आणायचं."मी नकाशाकडे बघितलं. 200 दुकानं. मागच्या वेळी 7 दुकानं मिळवायला मला 2 महिने लागले होते. आता 200 दुकानं 15 दिवसात?मी म्हणालो, "अण्णा, हे