नाते डायरीशी ... - 3

  • 309
  • 102

सोमवारची सकाळ... आज कॉलेजच्या गेट जवळ नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती..कोणाच्या हातामध्ये फाईल्स, कोणाच्या हातामध्ये कॉफी, कुणी बस पकडण्यासाठी पळत होते, तर कोणी अटेंडंस कमी असल्यामुळे प्रोफेसरच्या मागे फिरत होतं. आरव आजपण नेहमीप्रमाणे थोडा लवकर आला होता.त्याच्या हातात लॅपटॉप बॅग होती आणि दुसऱ्या हातात प्रॉजेक्ट ची फाइल होती. तो थेट क्लासरूम मध्ये शिरला ... तिथे अगोदरच चारपाच मुलं होती.. त्याने त्याची नेहमीची जागा पकडली.. लॅपटॉप सुरू केला आणि प्रोजेक्ट ची फाइल चालू केली. काल रात्री त्याने प्रश्नावली पुन्हा एकदा पाहिली होती.. प्रोफेसर कुलकर्णी ने दिलेला प्रोजेक्ट साधा दिसत होता पण प्रत्यक्षात बरंच काम होतं... प्रोजेक्ट टॉपिक होता..Consumer Behaviour and Digital Buying