"आणि हो जाता जाता तुझ्यात असलेलं गुपित मी तुला सांगून जातो ""माझ्यात असलेलं गुपित?? Heh??"ती पुटपुटली."सांग काय आहे ते "तिने रिप्लाय केला."हा सांगतो.. पण अगोदर आभारप्रदर्शन करायला नको का तुझे...""Heh"तिला आणखी गोंधळात टाकलं."वैदेही देवी आम्ही आपले खूप आभारी आहोत.. तुमच्यासारखं कोणीच नाहीये जो माझ्याशी मनातल्या गोंधळाचं उत्तर शोधू शकेल. माझं कावरं बावरं झालेलं मन ऐकू शकेल...तुमच्यातच ती गोष्ट आहे देवीअशीच कृपा राहवो ""तथास्तु बालक अष्टपुत्र सौभाग्यवती भव"तो हसला."देवी अगोदर सौभाग्यवती तरी येउदे आयुष्यात तेव्हा हे आशीर्वाद द्या अगोदरच देऊन ठेवले. चुकून माझ्यावर लागू झाले तर ""अरे मग तर आणखी बेहेत्तर... तसंही तू माणूस नाहीयेस.. मग बघूया ना आपण एक्सपेरिमेंट करून