दैत्य - भाग 5

  • 153

भाग ५रात्र शहरावर पूर्ण उतरली होती. वर आकाश काळं, खाली दिव्यांचे तुकडे. पण बंदराकडचा भाग वेगळाच होता...जिथे प्रकाशही सावधपणे उभा असतो. ओलसर हवा, लोखंडाचा वास, दूरवर आदळणाऱ्या लाटांचा मंद आवाज… आणि मध्येच भेसूर शांतता.गाडी सरळ रस्ता कापत पुढे जात होती.अबीर स्टेअरिंगवर स्थिर हात ठेवून ड्राईव्ह करत होता. चेहऱ्यावर भाव नव्हते. बाहेरचे दिवे काचांवरून सरकत होते, पण त्याची नजर पुढेच होती. फोन व्हायब्रेट झाला. त्याने स्क्रीन कडे पाहिलं... मेसेज होता..स्पॉट रेडी दुसरा मेसेज....राणा चेक इन मिस्ड . फोन अनरीचेबल .त्याची नजर त्या ओळीवर दोन सेकंद थांबली. राणा वेळ चुकवणाऱ्यांपैकी नव्हता.तो लालची असू शकतो. कपटी असू शकतो. पण बेजबाबदार नव्हता. मग का?म्हणजे दोनच