Cancer Phobia : सत्य आणि भ्रम - 2

  • 861
  • 297

CANCER PHOBIAभाग २ : कॅन्सर का होतो? रोजच्या सवयींमध्ये दडलेला धोका!लेखन : अविनाश भिमराव ढळेएक अश्वस्थामा ------------------------------------------------------------------------“प्रत्येक आजारामागे एकच कारण असते असे नाही. पण काही धोके आपण ओळखू शकतो, काही सवयी बदलू शकतो आणि काही आजारांचा धोका कमी करण्यासाठी आजपासूनच पावले उचलू शकतो.”१. एक साधा प्रश्न, ज्याचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजेनागपूरच्या एका गजबजलेल्या चौकात सकाळ सुरू झाली आहे. कुणी कामावर जाण्यासाठी बस पकडत आहे, कुणी दुचाकीवरून दुकान उघडायला निघाले आहे, कुणी शेतमाल विकण्यासाठी बाजाराकडे जात आहे, तर कुणी मुलांना शाळेत सोडून स्वतःच्या कामाला लागले आहे.या गर्दीत अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि नाश्त्याने होते. काहींच्या खिशात सिगारेटचे पाकीट असते, काहींच्या हातात गुटख्याची