भाग ३संध्याकाळ झाली होती.दमन त्याच्या आवडत्या कॅफेमध्ये बसला होता. समोर कॉफीचा मग ठेवलेला होता, पण त्याचं लक्ष वारंवार दाराकडे जात होतं. तो कोणाची तरी वाट पाहत होता.काही मिनिटांनी रोहन आत आला."इतक्या लवकर?" दमनने विचारलं.रोहन समोरच्या खुर्चीत बसत हसला."तुझं नशीब चांगलं आहे.""मिळाली माहिती?"दमनच्या आवाजातली अधीरता लपली नव्हती."सगळी."दमन सरळ होऊन बसला.रोहनने मोबाईल टेबलवर ठेवला."स्पृहा वैद्य."हे नुसतं नाव ऐकताच दमनच्या ओठांचे कोपरे नकळत रुंदावले.रोहनने ते पाहिलं आणि डोकं हलवलं."तुझी केस गंभीर आहे."दमनने त्याकडे दुर्लक्ष केलं."पुढे बोल."रोहन काही क्षण शांत राहिला.मग म्हणाला,"वय तीस."दमनच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही."मग?""मग म्हणजे?""पुढे."रोहनने दीर्घ श्वास घेतला."लव्ह मॅरेज झालं होतं.""एक वर्षापूर्वी तिचा नवरा गेला."क्षणभर...दमनच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं."काय?""हो. कॅन्सर."रोहनचा आवाज