भाग 2 वरून पुढे " मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी " वेटरच्या आवाजाने अदिती भानावर आली.खरंतर मनात प्रेमरंगाचा मयूरपिसारा फुलला होता. आपल्या केसांशी चाळे करत अजूनही ती त्याला चोरनजरेने न्हाहाळतच होती पण साधी नजरा नजरही न व्हावी केवढं हे दुर्दैव. पोटात असंख्य फुलपाखरांनी अगदी थव्याने उडून मनला खट्याळ गुदगुल्या कराव्या असेच काहीसे तिला भासत होते.मनाच्या लडिवाळ द्वंदात तिने पिझ्झा आणी हॉट कॉफी कधी संपवली हे तिला देखील कळले नाही. " मॅडम आपले बिल " वेटरने परत एकदा तिच्या मनातल्या पहिल्या प्रेमद्वंदाला भंग केले होते. पैसे देण्यासाठी अदिती आपली पर्स चाचपडू लागली होती पण दुर्दवाने ती पर्स तिच्या रूमवरच विसरली