एक प्रेमकथा अशीही.... - भाग 9

  • 417
  • 102

एक प्रेम कथा अशीही... भाग 9      भाग 8 वरून पुढे       सूर्य पश्चिमेकडे सरकू लागला होता. आजूबाजूलचा सर्व परिसर  तांबूस  प्रकाशाने न्हाहून निघाला  होता. जणू अस्ताला जाणारा सूर्यहि सोने उधळीत असावा असेच  भासत होते. अधूनमधून सुंदर असे राघू, मैनेचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. हलक्या हलक्या वर्षासरी वरुणच्या नेत्राला मोरपंखी स्पर्श करीत होत्या. " कही दूर जब दिन ढल जाये सांझ कि दुल्हन बदन चुराये... " कुठेतरी रेडिओवर सुरु असेलेले जुने गाणे त्या सायंकाळचे सौंदर्य अधिकच खुलवत होते . एका हातात गुलाब पुष्पाला अलवार स्पर्श करीत वरुण त्याच्या घराच्या समोर असलेल्या बागेत उभा होता. " अरे मित्रा नक्कीच पार्टी करू..