भाग 9 वरून पुढे ' डुबा डुबा रहता हू आँखो मे तेरी दिवाना बन गया हू मै चाहत मे तेरी अब दिन गुजरते नही राते कटती नही ..' हॉस्टेलमध्ये सुरु असलेल्या कर्णकर्कश्य स्वरांनी अभिमन्यूची निद्रा भंग पावली. रूममध्ये मुलांचा एकच गोंधळ सुरु होता. सकाळी सकाळीच मुलांनी रूममध्ये दंगामस्ती करायला सुरवात केली होती. एकजण ओढणी अंगावर घेतल्यासारखी मुलींची नक्कल करीत होता. मुलांच्या दंगामस्तीचा जोरही भयंकर वाढत होता .खरंतर अभिमन्यूला अंथरुणातून उठायची जराही इच्छा होत नव्हती; परंतु त्याच्या निरागस श्रुतीला आज तो बघणार या कल्पनेने तो चांगलाच सुखावला होता आणी तेच नाव त्याला अंथरुणातून उठवण्यास पुरेसे होते. प्रेम ही भावनाच मुळी जरा वेगळी आहे