एक प्रेमकथा अशीही.... - भाग 11

  • 303
  • 120

भाग 10 वरून पुढे श्रुती आणी माझ्यातही जे दोन वर्षामध्ये गैरसमजुतीचे धुके पसरले आहे...खरंतर गैरसमजुतीचे धुके म्हणणं अतिशयोक्तीचे ठरेल आमच्यात जे खूप मोठ्या कालावधीमुळे अबोलपणाचे धुके पसरले आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं एवढीच इच्छा आहे ' अभिमन्यूच्या मनात बऱ्याच गोष्टी दाटून आल्या होत्या. कानात इअरफोन लावून तो त्याच कॉलेज मागे टाकत समोर समोर सपासप  चालत होता. पाऊले आता ज्ञानभारती कॉलेजकडे वळली होती. योगायोगाने त्या पावसाळी वातावरणात गाणंही अगदी साजेस वाजत होत. ' पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा   पाऊस दाटलेला ,माझ्या घरावरी हा   दारास भास आता , हळुवार पावलांचा    हळुवार पावलांचा ,पाऊस दाटलेला 'गाणं ऐकता ऐकता तो कधी ज्ञानभारती महाविद्यालयात पोहचला हे