भाग 11 वरून पुढे श्रुती आणी अभिमन्यू कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोहचतात. कॅन्टीनमध्ये जराही गर्दी नव्हती. श्रुती दोन कप कॉफीची ऑर्डर देऊन हलकंस स्मितहास्य देत अभिमन्यूसमोर येऊन ती बसते. चेहऱ्यावर आणलेलं उसनं स्मितहास्य ओळखायला अभिमन्यू जराही चुकला नाही. समोर वाफाळलेले कॉफीचे दोन कप आले होते." हल्ली कॉफि प्यायला आवडत नाही मला. बालपणात म्हणजेच दहावीपर्यंत कॉफी प्यायला फार आवडायचं आणी त्याला कारण म्हणजे तेव्हा सर्व गोष्टी अगदी प्रमाणबद्धपणे सुरळीत होत्या ; पण आता बऱ्याच आवडीनिवडी बदल्याय. कॉलेजमध्ये नव्या ग्रुपसोबत राहून राहून चहा प्यायची सवय झालीय मला .त्यातच ऋतुजाला चहा जास्तच आवडतो ना " मृदू स्वरात अभिमन्यू म्हणाला. त्याच्या बोलण्याचा नक्की उद्देश काय होता हे