शनिवारची सकाळ होती, मुंबईत शनिवार म्हणजे कॉलेजच्या स्टुडंट्स साठी दोन प्रकारचा असतो, काहींसाठी उशिरा उठायचा म्हणजेच रोजच्यापेक्षा थोड अजून.. आणि काहींसाठी आज आपल्याकडे वेळ आहे तर आपलं काम करून घेऊ अशा प्रकारे ...आरव दुसऱ्या प्रकारात येत होता.. त्याला त्याचा वेळ वाया घालवून द्यायचं नसत.साडे आठच्या आसपास आरव ने खिडकी उघडली.... खिडकी उघडताच बाहेर वाट पाहू असणाऱ्या सूर्याची किरणं भसकन आतमध्ये आली.. .टेबलावर कालची प्रोजेक्ट फाइल ठेवलेली होती बाजूला लॅपटॉप, दोन पेन आणि एक अर्धवट भरलेला कॉफी मग आणि अर्थातच त्याची ती काळी डायरी...आरवची आई किचन मध्ये नाश्ता करत होती, आरव अजून कसा उठला नाही म्हणून तिने आरवला आवाज दिला...आरव..हम... आरव