भाग ४ऑफिस सुटायची वेळ झाली होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. कॉर्पोरेट बिल्डिंगमधून एम्प्लॉयी एकामागून एक बाहेर पडत होते. कुणी फोनवर बोलत होतं.कुणी घरी जायच्या घाईत होतं.आणि समोरच्या बाजूला... काळ्या सुपरबाईकला टेकून दमन उभा होता.गेल्या आठ दिवसांपासून तो तिला फक्त दूरून पाहत होता.पण आज...आज तो तिच्याशी बोलणार होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. मग बिल्डिंगच्या दरवाजाकडे. आणि तेवढ्यात...ती बाहेर आली.... स्पृहा ऑफ-व्हाईट शर्ट.काळी ट्राउझर.खांद्यावर लॅपटॉप बॅग.एका हातात मोबाईल.ती कुणाशीतरी बोलत चालली होती.दमनची नजर तिच्यावर स्थिरावली.आणि त्याच्या छातीत तीच धडधड सुरू झाली.अनोळखी... नवीन.... पण आता आवडू लागलेली.त्याने एक दीर्घ श्वास घेतला.... स्वतःलाच धीर दिला.आणि तिच्या दिशेने चालू लागला.स्पृहाने फोन ठेवला.ती पार्किंगच्या दिशेने वळणार इतक्यात...दमन