अनामत - भाग 4

  • 795
  • 258

भाग ४सकाळची कोवळी किरणं बाल्कनीतून हॉलमध्ये पसरली होती.बाळाची नुकतीच छान झोप झाली होती. त्याला मऊ गादीच्या पाळण्यात उन्हाची झळ थेट लागणार नाही अशा जागी ठेवलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर सकाळच्या प्रकाशाची सोनेरी छटा पडली होती.पाळण्यात पडून पडून आता त्याचे छोटे छोटे पाय मात्र सायकल चालवल्यासारखे सुरू झाले होते. कधी पाय वर उचलायचे, कधी हातांची बोटं उघडझाप करायची, तर कधी स्वतःच्याच हालचालींनी तो दचकून थांबायचा.त्याच्या शेजारी देवर्षय खाली बसला होता.शिवांश ड्युटीसाठी तयार होऊन हॉलमध्ये आला, तेव्हा घरात सगळ्यांची सकाळची लगबग सुरू होती. खिडकीतून येणारा कोवळा प्रकाश हॉलमध्ये पसरला होता. पाळण्यात पहुडलेलं बाळ मात्र स्वतःच्याच विश्वात रमलं होतं. कधी पाय वर उचलत होतं,