ययाती : एक साहित्यिक, मानसिक आणि तात्त्विक शोधभाग ३ : शर्मिष्ठा : स्वाभिमान, अस्तित्व आणि त्यागाच्या वेदनेचा शोधलेखक : अविनाश भिमराव ढळे | एक अश्वस्थामाCopyright ©️ All rights are reserved under copyright act ___________________________________________ मानवी जीवनात काही व्यक्ती आपल्या परिस्थितीमुळे मोठ्या ठरतात, काही आपल्या निर्णयांमुळे, तर काही अशा असतात की त्यांच्या वाट्याला आलेल्या वेदना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनपेक्षित पैलू उघड करतात. एखाद्या व्यक्तीचे जीवन समजून घेण्यासाठी तिच्याकडे काय होते, यापेक्षा तिच्याकडून काय हिरावून घेतले गेले आणि त्या परिस्थितीत तिने स्वतःला कसे सावरले, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण