Complicated Love - 5

  • 372
  • 141

भाग 4 वरून पुढे " आता कसं वाटतय तुला ?" डॉक्टरांच्या प्रेमळ शब्दांनी भूतकाळात हरवलेली अदिती वास्तविक जगात परतली. केळीच्या गाभ्यासारखे तिचे नाजूक हात वेदनेने  जखडले होते. चेहऱ्यावरील तेजस्वी कांती कुठेतरी विरून गेली  होती. लहानशी हालचाल करण्यातही तिला बराच त्रास जाणवत  होता. लांबसडक अगदी झुपक्या झुपक्याने बहरणाऱ्या देवदार वृक्षाप्रमाणे  तिच्या  मनात भूतकाळातल्या आठवणी  बहरल्या होत्या. " हो आता ठीक आहे मी" शब्दांची जुळवाजुळव करीत अदिती म्हणाली. " तुझ्या घरच्यांना आम्ही तुझ्याबद्दल कळवलंय काही वेळातच तुझे आई बाबा येईल इथे.   तुझी प्रकृतीही  आता काहीशी स्थिरावलीय तुला आता जनरल खोलीत हलवायला काही हरकत नाही". धीर देत डॉक्टर म्हणाले. अदितीनेही फक्त होकारार्थी मान डोलावली. अदितीला ICU मधून