भाग 5 वरून पुढे खोलीत कुणाच्यातरी धारदार शस्त्र असलेल्या सावल्या अधिकच गडद होत चालल्या होत्या. शरीरात उसडलेल्या वेदनेमुळे अदितीला एका जागेवरून साधं हलताही येत नव्हतं. तरीसुद्धा ती त्या सावल्यांचा कानोसा घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करीत होती. मनात एका अनामिक भीतीची हुरहूर लागली होती. एवढ्यात कुणाच्यातरी सॅण्डलचा आवाज तिच्या कानावर आदळू लागला तश्या त्या सावल्याही कुठेतरी अदृश्य झाल्या. अदितीच्या आईने तिच्या खोलीत प्रवेश केला. अदितीची अशी अवस्था पाहून आईच्या नेत्रात दुःखरूपी साचलेले मळभ गालावरून ओघळू लागले होते. अदितीच्या कपाळावरून मायेचा हात फिरवत नक्की काय घडले याची ती प्रेमळपणे विचारणा करीत होती. अदितीने सर्व घटना विस्तारित करून एकापाठोपाठ सांगितल्या. आपल्या एकुलत्या एका मुलीची अशी अवस्था