रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 2

  • 555
  • 195

काळ्या एसयूव्हीच्या मागच्या सीटवर कमालीची शांतता पसरली होती... बाहेर मुसळधार पाऊस गाडीच्या काचांवर आदळत होता , जणू निसर्गही बाहेर घडणाऱ्या वादळाची साक्ष देत होता... पण गाडीच्या आतलं वातावरण त्या वादळापेक्षाही जास्त भयानक आणि गुदमरवून टाकणारं होतं... गाडी वेगाने धावत होती , आणि काव्याच्या हातातील फॉरेन्सिक किट थरथरत होती..लवकर कर... माझ्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही,.. रुद्रचा आवाज पुन्हा एकदा त्या बंद गाडीत घुमला... त्याचा आवाज इतका थंड होता की काव्याच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी धावून गेली...काव्याने स्वतःचे थरथरणारे हात एकत्र जोडले आणि दीर्घ श्वास घेतला.. ती एक फॉरेन्सिक सायंटिस्ट होती.. तिने आजवर अनेक मृतदेह पाहिले होते , रक्ताचे पाट पाहिले होते ,