त्या अंधाऱ्या खोलीत वेळ जणू गोठून गेला होता... खिडकीच्या लोखंडी गजांमधून बाहेर पडणाऱ्या पावसाचा एकसारखा येणारा आवाज आणि अधूनमधून होणारा विजेचा कडकडाट , एवढंच काय ते त्या शांततेचा भंग करत होतं... काव्या जमिनीवर तशीच गुंडाळी करून बसून होती.. थंडीने तिचं शरीर गारठलं होतं , पण त्याहून अधिक तिच्या मनातील भीती तिला पोखरत होती.. ती सतत तिच्या काकांचा—इन्स्पेक्टर सावंत यांचा विचार करत होती...रुद्रने दिलेल्या धमकीने तिचे अवसान गळाले होते... हा माणूस जे बोलतो , ते करू शकतो , याची तिला पूर्ण खात्री पटली होती...तिने अंधारातच चाचपडत स्वतःला सावरले आणि ती उभी राहिली... एक फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तिला संकटात डोकं शांत ठेवण्याची