नाते जन्मापलिकडचे - भाग 20

  • 567
  • 162

"हे काय आहे नक्की?"भुवयी आक्रसल्या गेल्या. तेवढ्यात त्यांची तंद्री मोडली गेली."गुरुजी!काय झालं? भुवयी का आक्रसतेय?""नाही काही नाही. बरं त्यांचं मार्गदर्शन कर बरं का "दिव्यम ने मान डोलावली.गुरुजी विचार करत निघून गेले.अकरावीचा वर्ष संपला.. बारावी आली.बारावीचा वर्ष देखील जवळ जवळ संपत आला.फेब्रुरी मध्ये शिव चा वाढदिवस होता. तिला वाटून गेले,'ह्याचा वाढदिवस बरोबर याच महिन्यात येतो, प्रेमाच्या महिन्यात. सगळेच त्यावर प्रेम करतात. सगळ्यांचा लाडका आहे वरतून, सगळ्यांना आकर्षित देखील करतो. त्या सर्व व्यक्तींमध्ये मी देखील येते, पण आपण इतके लांब आहोत कि त्याच्या प्रेमाचा अनुभव देखील कधी घडणार नाही .मी कधी कोणावर प्रेम नाही करणार. ती हिम्मत तरी होईल का कोणावर प्रेम