माझं काही चुकलं का ! सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा विश्रांतीचा काळ समजला जातो. पण जीवनभर काबाडकष्ट करून, कधी मन मारून, तर कधी मनोरंजनाला दूर सारून, तर कधी गरीबीत दिवस काढलेले असते. काही वेळेस तर परिस्थिती नसतांना देखील संकटातून मार्ग काढलेला असतो. त्यातूनच घर आणि थोडीफार पुंजी भविष्यासाठी राखून ठेवलेली असते. परंतु काळ बदलतो आणि एक दिवस संकटे उभे राहतात. असेच काहीसे विनायकच्या जीवनात घडले होते. मी सहजच विनायकला म्हणालो, "एवढे काय झाले रे! तुम्ही दोघेही चिंतेत आहात." तो म्हणाला, "आमचे निर्णय चुकलेत