काऊ आणि चिऊ लहानपणीचे खूप आवडणारे पक्षी आणि अगदी पहिले मित्र होते माझे......लहान असतांना कावळा चिमणी ला भेटल्याशिवाय जेवण जायचंच नाही मला... ते समोर असतील तर किती जेवतिये तेही कळायचं नाही...पण काऊ किंवा चिऊ,कोणीच नसेल बागेत तर मी जेवण बंदच करायचे... मग आई त्यांच्या गोष्टी सांगून जेवण भरवायची....लहानपणी काऊ आणि चिऊ फक्त तिथपर्यंतच मजल गेली होती माझी.... त्यांना पाहून आणि त्यांच्या गोष्टी ऐकून मोठी झाले खरी पण नंतर अभ्यास आणि इतर गोष्टीमध्ये मी इतकी रममाण झाली कि माझ्या आयुष्यातून पक्षी कुठेतरी हरवूनच गेले...बागेत कितीतरी पक्षी यायचे...पण कोणत्याही पक्ष्याकडे पाहायला मला वेळच न्हवता...