प्रेमभावना एक आदिम भावना आहे. या भावनेचे सामर्थ्य इतके मोठे आहे की ,प्रेमा साठी काहीही करण्याची मानसिक तयारी होते ., प्रेम ही श्रद्धा आहे ,, भक्ती आहे , प्रेमात समर्पण असते, प्रेमात मिलनाची फलश्रुती असेलच असे नाही , प्रेमात विरह असतो, वियोग ही असतो. प्रेमातले दोन जीव नदीच्या दोन किनारे असल्यासारखे सारखे असतात, जे असतात सोबत पण कधीच एकत्र न येऊ शकणारे .. ज्यांचे प्रेम सफल ते नशीबवान ,ज्यांचे प्रेम विफल ते आयुष्यभर प्रेमाची वेदना उराशी कवटाळून जगत असतात.सफल न झालेल्या प्रेमाची एक करुण-गाथा आज मी ऐकवणार आहे..