खुलली प्रेमाची कळी....

(24)
  • 6.5k
  • 7
  • 1.8k

निशा ला तिचा भूतकाळ अजिबात आठवायचा न्हवता. त्यामुळे तिनी स्वताला एकदम व्यस्त करून घेतलं होत. निवांत वेळ मिळाला की भूतकाळ तिच्या समोर नाचायला लागायचा. आणि भूतकाळ आठवून तिला दुःखी व्हायचं न्हवत. म्हणूनच ती सतत कामात व्यग्र रहायची! पण एके दिवशी निशा ला खूप एकट वाटत होत. तेव्हा नकळत तिनी तिची डायरी उघडली आणि ती वाचायला लागली. खर तर, निशा तिची डायरी वाचायचं टाळायचीच.. कारण डायरी वाचून तिचा भूतकाळ परत तिच्या डोळ्यासमोर येऊन ती दुःखी होईल अशी तिला भीती वाटायची. तिची डायरी फक्त लिहिण्यापुर्ती होती... एकदा का लिहून झाल की ते अजिबात परत परत वाचायचं नाही अस तिनी मनोमन ठरवलं होत... कॉलेज मधले सुंदर दिवसाची नोंद तिने तिच्या डायरीत करून ठेवली होती...कॉलेज मध्ये काही दिवस तिने डायरी न चुकता लिहिली. पण जॉब चालू झाला आणि काही वर्षांपासून तीचं डायरी लिहीण बंद झालेलं.