किमया प्रेमाची

(24)
  • 10k
  • 9
  • 2k

तेव्हा माझ्या पतींची काही दिवसांसाठी पुण्याला बदली झाली होती.मी नुकतीच बँकेतून. व्हाॅलंटरी रिटायरमेंट घेतली होती त्यामुळे मीही त्यांच्याबरोबर पुण्याला गेले होते. आमच्या बंगल्याच्या बाजूलाच. देसाई वकीलांचा बंगला होता.बँकेतल्या खात्यासंदर्भात त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी ओळख झाली.एकमेकांच्या घरी येणे-जाणेही चालू झाले.त्यांचा मुलगा विक्रम इंजिनियर होता.पुण्याच्या एका काँप्यूटर कंपनीत एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करत होता.त्यांची मुलगी नेहा तेव्हा काॅलेजमध्ये होती.