.... तर हे भूत - बीत सगळं खोटं असतय. कळालं ?" मनोहरने स्ट्राइकर टोलवून शेवटची कवडी होलमध्ये पाडली, आणि कॅरमचा डाव आणि ' हा ' विषय दोन्ही संपवले.‌ रात्री साडे अकराची वेळ. अक्षय, मनोहर व सुरेश रविच्या घरी कॅरम खेळण्यासाठी जमलेले. आज फारच उशीर झाला होता. घरातील सर्व झोपले होते, त्यामुळे चौघेही बाहेर पोर्चमध्ये बसले होते. तास - दीड तास मस्त डाव रंगला होता, आणि चौघांच्या गप्पाही. बोलता बोलता सहज विषय निघाला की, भूतंखेतं, अमानवी शक्ती अशा गोष्टी खरच असतात का ? यावर मनोहरच म्हणणं होतं, भूत - बीत वैगेरे खोटं असतं. हे सगळे फक्त मनाचे खेळ असतात. याउलट

नवीन एपिसोड्स : : Every Thursday

1

भूत - भाग १

.... तर हे भूत - बीत सगळं खोटं असतय. कळालं ?" मनोहरने स्ट्राइकर टोलवून शेवटची कवडी होलमध्ये पाडली, आणि डाव आणि ' हा ' विषय दोन्ही संपवले.‌ रात्री साडे अकराची वेळ. अक्षय, मनोहर व सुरेश रविच्या घरी कॅरम खेळण्यासाठी जमलेले. आज फारच उशीर झाला होता. घरातील सर्व झोपले होते, त्यामुळे चौघेही बाहेर पोर्चमध्ये बसले होते. तास - दीड तास मस्त डाव रंगला होता, आणि चौघांच्या गप्पाही. बोलता बोलता सहज विषय निघाला की, भूतंखेतं, अमानवी शक्ती अशा गोष्टी खरच असतात का ? यावर मनोहरच म्हणणं होतं, भूत - बीत वैगेरे खोटं असतं. हे सगळे फक्त मनाचे खेळ असतात. याउलट ...अजून वाचा

2

भूत - भाग २

दाट काळोख पसरला होता. आज बहुतेक अमावस्या असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घर होती, पण यावेळी साहाजिकच सगळ्या घरांच्या लाइट्स होत्या. क्वचित एखाद्या घराबाहेर एखादा बल्ब जळताना दिसायचा. चिडीचूप शांतता पसरलेली होती. मनोहर आपल्याच विचारात मग्न होऊन चालला होता. चहुबाजूंनी पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधाराकडे, भीतीदायक वातावरणाकडे त्याच बिलकुल लक्ष नव्हत. अर्थात, असतं तरी त्याला काही फरक पडला नसता. मनोहर वाकडे. दिसायला चारचौघांसारखाच. गहूवर्णी चेहरा, मध्यम उंची, किंचीत बेडौल बांधा, नाकी डोळी बरा. व्यक्तिमत्वातही विशेष असं काही नव्हतं. स्वभावही जरा विक्षिप्तच. त्याच्यात इतरांना आवडावी अशी एकच गोष्ट होती. ती म्हणजे त्याच बोलणं. कुठल्याही विषयावर त्याची मते तो इतक्या रोखठोक व ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय