आपल्या आईच्या उदरात वाढत असलेली निरागस मुलगी. एक समाधिस्त,संन्यस्त अतिउच्च कोटीतील मनुष्य जर कुठे खरा भेटत असेल तर तो आईच्या उदरातच.या जीवाला बाहेरच्या जगाशी काही-काही घेणं देणं नसतं. सभोवताली आईच्या उदराचे अंतराळ,असंख्य पेशा म्हणजे त्यातील तारका आणि या सगळ्यांचा सूर्य म्हणजे खुद्द आई.सजीव-निर्जीव या संवेदना देखील जाणवू नयेत इतकं शांत आणि सुरक्षित ते जग,त्या जीवाला मग चांगले-वाईट,छळ-कपट गरीब-श्रीमंत गावीही नसतात.असंख्य भावनांच्या समिधा पडतात तेव्हा तर मातृत्वाचा होम जळतो.आधी मुलगी म्हणून मग बहीण,बायको,वहिनी,सून,आई इतकंच नव्हे तर अबला,सबला, सुंदर,कुरूप,शीलवान, व्याभिचारी अशी एक ना अनेक कापडे स्त्रियांना घातली जातात.पण आज उदरात असलेल्या जीवाला कुठं कापड आहे? तो देह नाही,ती तर एक ऊर्जा आहे.ऊर्जा म्हणजे तरी काय असते?

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday & Friday

1

स्थित्यंतर - भाग1

उंचच उंच झोके घेत असताना अचानक कोणी आडवे यावे याशिवाय मोठा विचका तो कोणता? अगदीच सोपं करून सांगायचं झालं एखादं लहान मूल मिटक्या मारत कुल्फी खात असावं आणि अचानक ते खाली पडावं असेच काहीसेसावी चे झाले होते. सावी….आपल्या आईच्या उदरात वाढत असलेली निरागस मुलगी.एक समाधिस्त,संन्यस्त अतिउच्च कोटीतील मनुष्य जर कुठे खरा भेटत असेल तर तो आईच्या उदरातच.या जीवाला बाहेरच्या जगाशी काही-काही घेणं देणं नसतं. सभोवताली आईच्या उदराचे अंतराळ,असंख्य पेशा म्हणजे त्यातील तारका आणि या सगळ्यांचा सूर्य म्हणजे खुद्द आई.सजीव-निर्जीव या संवेदना देखील जाणवू नयेत इतकं शांत आणि सुरक्षित ते जग,त्या जीवाला मग चांगले-वाईट,छळ-कपट गरीब-श्रीमंत गावीही नसतात.असंख्य भावनांच्या समिधा पडतात तेव्हा ...अजून वाचा

2

स्थित्यंतर - 2

2.'अजून देणे आयुष्याचे फिटले नाहीअजून माझे दुःख पुरेसे वटले नाही'"मी सुधा, रेवती ची सासू.भट साहेबांच्या या ओळी म्हणजे माझ्या प्रतिबिंब. मी एक स्त्री आहे हाच मोठा प्रश्न आणि हेच त्या प्रश्नामागचं उत्तर.पण मी उत्तर शोधत बसले नाही,माझ्या पिढीला ते मान्य नव्हतं. प्रस्थपितांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकलं,तेच अंगिकारले.स्त्री म्हणून ठिणगी-ठिणगी जळून गेलं मन आणि तन सुद्धा.एक समंजस सून झाले,घराची कारभारीन झाले.आदर्श वहिनी झाले,आज्ञाधारक बायको झाले.आई म्हणून कौतुक झालं. पणआज सासू नावाचं लेबल लागलं तर माझे अवगुण अधोरेखित करायला सगळे पुढे सरसावले. स्त्री म्हणजे ऊर्जा म्हणणाऱ्यांनो आज मी ऊर्जा नाही का??उभा जन्म चांगलं वाईट शिकण्यात गेला.रीती भाती चांगल्या असतात, त्याचं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय