कालाय तस्मै नमः

(8)
  • 57.2k
  • 1
  • 27k

जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. खरं तर वाईट असतं म्हणूनच चांगल्या गोष्टी, व्यक्ती ह्यांची किंमत माणसाला कळते. युगानुयुगे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींच्या अलिखित चढाओढीवर तर जग चालते. कधी चांगल्याची सरशी होते तर कधी वाईटाची. माणसाची मनोवृत्तीही ह्या दोन्ही रंगांना दाखवते. जसं एखादा माणूस पूर्णपणे चांगला नसतो तसाच तो पूर्णपणे वाईटही नसतो. मनस्थिती कशी आहे हे नेहमी त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणती बाजू कधी वरचढ ठरणार हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीलाही सांगता येणार नाही. आता माणूस म्हटलं की भावनांची गुंतागुंत तर असणारच. एका बाजूला प्रेम,माया,आपुलकी,जिव्हाळा आहे तर दुसरीकडे द्वेष, राग, तिरस्कार, वैरभावनाही आहे. कुणाला तरी आजूबाजूचं सगळं जग सुंदर दिसतं तर कुणाला मात्र त्या जगाबद्दल खूप तक्रार आहे. हा प्रश्न आहे मनोवृत्तीने निर्माण केलेला. चांगल्यातून वाईट शोधायचं की वाईटातून चांगलं हे ठरवणं फक्त माणसाच्या हातात आहे.असो तर अशाच काही गोंधळातून एक दिर्घकथा साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलाच प्रयत्न आहे पण आवडेल ह्याबद्दल खात्री आहे.

नवीन एपिसोड्स : : Every Wednesday, Friday & Sunday

1

कालाय तस्मै नमः - 1

कालाय तस्मै नमः भाग १ जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. खरं तर वाईट असतं म्हणूनच चांगल्या व्यक्ती ह्यांची किंमत माणसाला कळते. युगानुयुगे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींच्या अलिखित चढाओढीवर तर जग चालते. कधी चांगल्याची सरशी होते तर कधी वाईटाची. माणसाची मनोवृत्तीही ह्या दोन्ही रंगांना दाखवते. जसं एखादा माणूस पूर्णपणे चांगला नसतो तसाच तो पूर्णपणे वाईटही नसतो. मनस्थिती कशी आहे हे नेहमी त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणती बाजू कधी वरचढ ठरणार हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीलाही सांगता येणार नाही. आता माणूस म्हटलं की भावनांची गुंतागुंत तर असणारच. एका बाजूला प्रेम,माया,आपुलकी,जिव्हाळा आहे तर दुसरीकडे ...अजून वाचा

2

कालाय तस्मै नमः - 2

कालाय तस्मै नमः| भाग २सुखाच्या हिंदोळ्यावरमाई आणि काका त्या दोघांना डोळे भरून बघत होते. तेव्हढ्यात संगीताने आत जाऊन ओवळण्यासाठी तुकडा आणि पाणी आणलं. माईंनी तिलाच ते करायला लावलं. आनंदाने तुकडा ओवाळून दोघांच्या पायावर पाणी घालत ती बाहेरच्या दिशेने गेली. ती परत आली तरीही ते तसेच उभे होते कारण माईंना आनंदाच्या भरात काही सुचतच नव्हते. भास्कर ज्याच्या लेकीचं बारसं आहे तो मागून येत म्हणाला, “दादा ये ना रे आत. तुझीच उणीव भासत होती. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय.” हसून त्याच्याकडे बघत त्याने मुलाचा हात धरूनच आत उजवा पाय टाकला. तसेच समोरच उभ्या असलेल्या माई आणि काकांना वाकून नमस्कार केला. त्या छोट्यानेही ...अजून वाचा

3

कालाय तस्मै नमः - 3

कालाय तस्मै नमः| भाग ३अरुंधती आणि श्रीपादची गोष्टस्वराचं बारसं फक्त थाटामाटातच नाही तर कुठलंही विघ्न न येता पार पडलं माई काका दोघेही समाधानी होते. त्यात श्रीपाद आणि कैवल्यच्या येण्यानेही भरच पडली होती. बारसं तसं सुट्टीच्या काळातच असल्याने सगळेजण अजून काही दिवस वाड्यातच असणार होते. त्या काळात फोन इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. मोबाईल तर अस्तित्वातच नसल्याने सगळे जण मस्त गप्पा मारत एकत्र बसले होते. बच्चेकंपनी धुडगूस घालण्यात गुंग होती. काका आणि श्रीपाद एका बाजूला बोलत होते. काका त्याला विचारत होते की तो आता इथेच राहणार आहे ना? त्यावर श्रीपाद म्हणाला, “काका, मी महत्त्वाच्या वेळी आपल्या लोकांसाठी नक्की येईन असा शब्द दिला होता ...अजून वाचा

4

कालाय तस्मै नमः - 4

कालाय तस्मै नमः| भाग ४आस्तनीतले साप श्रीपाद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधनेच्या खोलीतून बाहेर आला. साधनेच्या वेळी त्याला काही गोष्टींचा आला होता त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अरुंधतीच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. पण वैद्यांच्या औषधांमुळे तिचा त्रास बराच सुसह्य झाला होता. तिच्या तब्येतीची बातमी एव्हाना बाकीच्यांकडे पोहोचली होती. झालं गेलं बाजूला ठेवून सगळेजण एकेक करत वाड्यावर येण्यासाठी तयारी करत होते. सगळे येण्यापूर्वीच अरुंधतीला काकांना काहीतरी सांगायचे होते. त्यासाठी तिने श्रीपादला तशी कल्पना दिली. तसे काकांना त्याने सांगितले. त्यांनाही अंदाज आला होता. ते अरुंधतीच्या खोलीत गेले. जिला बघताक्षणी महालक्ष्मीचा भास काकांना होत असे, ती अरुंधती अगदी कृश अवस्थेत पहुडलेली होती. पण त्या अवस्थेतही ...अजून वाचा

5

कालाय तस्मै नमः - 5

कालाय तस्मै नमः| भाग ५ पारायण पहाटेच साधना आवरून श्रीपाद खोलीबाहेर आला. माई आणि संगीताची तयारी करून झाली होती. थोडंसं बरं वाटत असल्याने ती आज लवकर उठून आवरून बसली होती. घरात वेगवेगळ्या पूजा , पारायणे सतत होत असत त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती, जिथून संपूर्ण घराकडे नजर टाकणे शक्य होत असे. आणि वाचनाचा आवाजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जात असे. ह्या जागेच्या अगदी समोर एक खोली होती, जिथे अरुंधतीच्या बसण्याची व्यवस्था केली होती. तिला खूप वेळ बसून राहून ऐकणे शक्य नसल्याने झोपून ऐकता येईल अशी सोय होती. तसेच मधल्या जागेत इतरांसाठी बसण्याची सोय होती. देवाला नमस्कार करून श्रीपादने संकल्प सोडत वाचनास सुरुवात केली. ...अजून वाचा

6

कालाय तस्मै नमः - 6

कालाय_तस्मै_नमः| भाग ६अरुंधतीला निरोपपारायण सात दिवसांचं होतं. सगळा त्रास सहन करत अरुंधती रोज हट्टाने बसण्याचा प्रयत्न करत होती. सातवा दिवस होता. उद्यापन ही असणार होतं. घरातील सगळ्या स्त्रिया उद्यापनासाठी लागणाऱ्या तयारीत गुंतल्या होत्या. माई अरुंधतीच्या जवळ राहूनच छोटी छोटी मदत करत होत्या. सात दिवसात तिची तब्येत जरा नाजूकच झाली होती. पण चेहऱ्यावर असणारं तेज मात्र काहीतरी वेगळीच जाणीव करून देत होते. त्या दोन्ही व्यक्तींनी आपलं काम आता काही काळासाठी थांबवलं होतं. कारण घरात सुरू झालेल्या परायणामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास काय फटका बसेल ह्याची कल्पना त्यांना त्यांच्या मार्गात मदत करणाऱ्या ‘त्या’ साधकाने दिली होती. सध्या तरी शांत राहून जे होत आहे त्याचं ...अजून वाचा

7

कालाय तस्मै नमः - 7

कालाय_तस्मै_नमः| भाग ७भूतकाळात फेरफटकाअरुंधतीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी आयुष्य थांबणार नव्हते. अरुंधतीचे सर्व कार्य आटोपल्यावर महिनाभरात सर्व सोय बघून निघावे असे श्रीपादने ठरविले. तसे त्याने काकांना बोलूनही दाखवले. ते बोलणे माईंनी ऐकले आणि त्या श्रीपादला बघत म्हणाल्या, “निघावे म्हणजे? ती गेली म्हणजे तूही जाणार का तुझ्या वाटेने? कैवल्य - त्याचं काय?” श्रीपाद माईंना समजावत म्हणाला, “माई मी जातोय म्हणजे निघून नाही जात. बदली झाली आहे माझी, खरे कारण सांगायचे त्याने टाळले. आणि कैवल्यला ह्या वातावरणापासून दूर घेऊन गेलो तरच तो सावरेल नाही तर त्याला सतत आईची आठवण येत राहील. नवीन ठिकाणी नवीन माणसांमध्ये तो गोष्टी विसरून रमेल. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय