" हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....?" ' तिच्या ' मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनवर एका अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत ' ती ' म्हणाली. " तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. " " हा...! कोण बोलताय आपण.....? आई कुठे आहे.......? काय झालंय तिला......? " समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ' ती ' आश्चर्याने विचारू लागली. " हे बघा, तुमच्या आईकडे वेळ खूप कमी आहे आताच डॉक्टर सांगून गेलेत. मी पत्ता मेसेज करतोय तुम्ही लवकर या " " पण........ " बोलतच तिच्या हातात असलेल्या मोबाइलचा कॉल कट झाला. समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ती जवळच्या भिंतीचा आधार घेत खालीच बसली. तिच्या हातात असलेला मोबाईल खाली जमिनीवर आदळला. समोर एक अनोळखी व्यक्ती तिच्या आईची अवस्था दुरावल्याची सांगत होता. डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत न्हवते. खरतर ती एका अनोळखी शहरात आपल्या १२ बाय ८ च्या खोलीत एकटीच राहायची. घरची आर्थिक परिस्थिती दुरावल्याने कॉलेज सोबत एक छोटीसी जॉब करायची. एका अनोळखी शहरात अनोळखी ठिकाणी अनोळखी रूममध्ये एकटेच राहण हे तिच्यासाठी खूप नवीन होते. घरात फक्त ती व तिची आई हे दोघेच होते. कॉलेजचा पहिला महिना असल्या कारणाने ती आपल्या आईला सोबतीला आणू सकली न्हवती. तिची ही अवस्था ऐकून तिला रहाऊन राहत न्हवत. आपल्या रुमच्या एका कोपऱ्यात तीच रडण मुसमुसन सुरू झालं होत. काही क्षणात तिच्या मोबाइलच्या नोटिफिकेशन ट्यून ने तिचा लक्ष वेधून घेतलं. तशी ती थोडी भानावर आली. पांढऱ्या रंगाच्या बल्बच्या प्रकश्यात पूर्ण रूम पांढऱ्या रंगाच्या भिंतीने आणखीनच गडद वाटत होत. रूमच्या एकीकडे एक लाकडी कपाट, एक छोटंसं बेड, बाजूला असलेल्या टेबलावरील प्लॅस्टिकच्या भांड्यात असलेल्या फळांच्या बाजूला चकाकत असलेला प्यूर स्टेनलेस स्टीलचा चाकू जे बल्बचा उजेडात चमचम करत लकाकात होता. पण तिला ह्या कोणत्याच गोष्टीचा भान न्हवता. भान होता तो फक्त मोबाईलवर आलेल्या त्या बातमीचा.. मोबाइलचा पासवर्ड खोलून नोटीफिकेशन बघितल तर एक मेसेज तिथं आलेला. मेसेज वाचून आपल्या मैत्रिणीला कॉल केलं. तीन रींगच्या नंतर समोरून एक आवाज आला. " हॅलो.. हा बोल ग ह्या वेळेला का बर कॉल केली सगळे झोपले आहेत. वेळ बघितली आहेस काय..? रात्रीचे दिढ वाजलेत. ह्या वेळेला काय झालं..? "

1

भयभीत - 1

भयभीत लेखक :- अंकित भास्कर हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....? ' तिच्या मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनवर एका अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत ' ती ' म्हणाली. तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. हा...! कोण बोलताय आपण.....? आई कुठे आहे.......? काय झालंय तिला......? समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ' ती ' आश्चर्याने विचारू लागली. हे बघा, तुमच्या आईकडे वेळ खूप कमी आहे आताच डॉक्टर सांगून गेलेत. मी पत्ता मेसेज करतोय तुम्ही लवकर या पण........ बोलतच तिच्या हातात ...अजून वाचा

2

भयभीत - 2

भयभीत भाग 2 लेखक :- अंकित भाष्कर मोबाईलकडे लक्ष करत तिने कॉल रिसिव्ह केला. तस समोरून आवाज " हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? " आता पुढे "हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? " समोरून येणाऱ्या आवाजाने ती पूर्ती हादरून गेली. तिची भेदरलेली नजर मिनिटापूर्वी आलेल्या आपल्या मैत्रिणीला शोधू लागली. ती कुठेच दिसत न्हवती पण समोर तिची तीच मैत्रीण रितिका रागातच बोलत होती. समोरच आपल्या मैत्रिणीच आवाज ऐकताच ती जागेवरच स्तब्ध झाली. काहीच न बोलता तिच्या हातातील मोबाईल खाली जमिनीवर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय