सरकारी नोकरी नावाची माझी एकशे अकरावी पुस्तक आणि एक्यांशिवी कादंबरी. ही कादंबरी वाचकांना देतांना अतिशय आनंद होत असून यात दोन शिक्षकाची दयनीय अवस्था वर्णीत केल्या गेली आहे. म्हणतात की शिक्षण खातं चांगलं आहे. परंतु शिक्षण नावाच्या पवित्र खात्यात कोणता त्रास होतो? याचं वर्णन यात आहे. कादंबरी तसं पाहिल्यास जास्त वाचाविशी वाटणार नाही. कारण सत्य परिस्थिती लोकांना वाचणं आवडत नाही. ती कंटाळवाणी वाटते. परंतु अशीही शिक्षकांच्या जीवनाची दुरावस्था राहू शकते काय? याचा बोध या कादंबरीतून होतो. याव्यतिरिक्त या कादंबरीत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत थोडासा भाग आणल्या गेला आहे. हा भागही तेवढीच मराठ्यांची थोडीफार माहिती देवू शकतो.
सरकारी नोकरी - 1
सरकारी नोकरी या पुस्तकाविषयी सरकारी नोकरी नावाची माझी एकशे अकरावी पुस्तक आणि एक्यांशिवी कादंबरी. ही कादंबरी देतांना अतिशय आनंद होत असून यात दोन शिक्षकाची दयनीय अवस्था वर्णीत केल्या गेली आहे. म्हणतात की शिक्षण खातं चांगलं आहे. परंतु शिक्षण नावाच्या पवित्र खात्यात कोणता त्रास होतो? याचं वर्णन यात आहे. कादंबरी तसं पाहिल्यास जास्त वाचाविशी वाटणार नाही. कारण सत्य परिस्थिती लोकांना वाचणं आवडत नाही. ती कंटाळवाणी वाटते. परंतु अशीही शिक्षकांच्या जीवनाची दुरावस्था राहू शकते काय? याचा बोध या कादंबरीतून होतो. याव्यतिरिक्त या कादंबरीत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत थोडासा भाग आणल्या गेला आहे. हा भागही तेवढीच मराठ्यांची ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 2
*************** २ ************************* सृष्टी प्रेम करीत होती नोकरीवर. तिला होतं की सरकारी नोकरी लागावी. ज्यातून तिनं जे आजपर्यंत भोगलं. त्या यातनेतून मुक्ती मिळेल. तशी ती फार शिकली होती व देशात तिच्या समाजाला आरक्षण असल्यानं तिला शिकता आलं होतं. त्यातच नोकरीतही आरक्षण होतंच. तसं पाहिल्यास लवकरच तिला नोकरी लागली होती. प्रभास हा सृष्टीच्याच वर्गातील एक मुलगा. गावातच राहणारा. तोही बराच शिकला होता. परंतु त्याच्या समाजाला आरक्षण नव्हतं. त्यामुळं त्याला लवकर नोकरी लागली नाही. त्यासाठी त्याला प्रतिक्षाच करावी लागली बराच काळ. तद्नंतर त्यालाही नोकरी लागलीच. ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 3
******************* ३ ******************** आरक्षण काही लोकांना मिळालं होतं तर काही लोकांना आरक्षण नव्हतं. ज्यांना आज आरक्षण तो समाज मागासलेला बनला होता व ज्यांना आरक्षण मिळालं होतं. त्यातील काही लोकं नक्कीच वर गेले होते. ज्यात आरक्षण असलेला समाज शिक्षीत होताच त्याला नोकरीत असलेल्या आरक्षणानं नोकऱ्याही लागल्या होत्या. ज्या सरकारी स्वरुपाच्या होत्या. परंतु त्यांना सरकारी नोकऱ्या जरी लागल्या असल्या तरी त्या सरकारी नोकऱ्या नोकरीवर असलेल्या वर्गाचे एवढे निकृष्ट हाल करीत होत्या की त्यांच्यावर नोकरी करुच नये. असं म्हणण्याची वेळ यायची. नोकरी करुच नये असं वाटायला लागत असे. आरक्षण असल्यानंच ज्यांना आरक्षण होतं, त्या सृष्टी व ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 4
********************** ४ ************** शालार्थ आयडी घोटाळा अभियान यशस्वी होईल काय? सृष्टीला याबाबत विचार यायचा. विचार की हे जर अभियान यशस्वी झालं तर माझी नोकरी जाईल आणि मी कायमस्वरुपी नोकरीला मुकेल. तिला ही चिंता नव्हती की तिचे पैसे जाणार नाहीत. पैसे तर त्या शाळेतील संस्थाचालकाचेच जातील. परंतु नोकरी गमावण्याचं दुःख तिला होतं व ते दुःख तिला सतत जाणवत होतं. त्यातच त्या शालार्थ आयडी घोटाळ्यातून तिचं वेतनही बंद झालं होतं. प्रभासचा आणखी एक मित्र होता. ज्याचं नाव होतं अमेय. अमेय हा देखील शिकलेला होता. परंतु त्यालाही आरक्षण नव्हतं व त्याचा ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 5
******************** ५ *********************** ते मराठा आरक्षण व मराठ्यांचा आरक्षणाचा तो लढा. नेमकं हे आरक्षण संभ्रम करणारं होतं. संभ्रम याचा अर्थ मराठ्यांना असलेलं आरक्षण. दि. १९ फेब्रुवारी २०२४ म्हणजे शिवजयंतीच्या लगेच दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगामार्फत, ज्याचे अध्यक्ष मा. न्या. सुनिल शुक्रे होते. त्यांच्या अहवालानुसार मराठा समाजाचा विधानसभेत ठराव मंजूर करून १०% स्वतंत्र असे MSR-SEBC आरक्षण मराठा समाजाला दिलं. असं असतांना एक मराठा समाजाचा नेता आम्ही ओबीसी म्हणत कायद्याची लढाई लढत होता. तसेच ओबीसीतील आरक्षण असलेले आरक्षण आम्हाला द्या. आम्ही कुणबीच आहोत. असाही हवाला तो मराठा नेता देत होता. ज्यात तिनशे पन्नास जातींना फक्त ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 6
*********** ६ *********************** आरक्षण........ इतर समाजाला असलेलं आरक्षण. आरक्षण असल्यानं तथाकथित समाज पुढे गेला तो भरपूर शिकला होता व नोकरीला लागला होता. त्या समाजात बराच असा बदल झाला होता. मात्र तो समाज शिकलेला असला तरी वा उच्चशिक्षीत झाला असला तरी त्यांच्यातील संस्कार तुटले होते. प्रभासचा मित्र अमेय हा ओपन प्रवर्गातून होता व त्याच्या समाजाचा असा कोणताच लढा नव्हता की त्याच्या समाजाला आरक्षण मिळेल. त्यातच आरक्षणावरुन त्याच्या मनात नित्यनेमानं आरक्षणविरोधी विचार येत. त्याला वाटत होते की हे असं आरक्षण नकोच द्यायला. कारण आरक्षणानं देश कमजोर होत आहे व संस्कार तुटत ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 7
******************** ७ *********************** दगड माती देवच आहेत आपल्यासाठी. याबाबत एक व्हिडिओ आला फेसबुकवर. दगड, माती तसं पाहिल्यास उच्च शिक्षीत लोकंही आज दगड, मातीच्या देवाची पुजा करु लागले आहेत व हे प्रमाण वाढलेले आहे. ज्यात चमत्कार होतो व लाभ मिळतो. असं प्रभासचं म्हणणं होतं. 'उच्च शिक्षण...... म्हणतात की शिक्षणानं ज्ञान येतं. माणसं सुशिक्षित होतात. परंतु ते सर्व बोलणं वायफळ वाटतं. कारण लोकं कितीही सुशिक्षित झाले असले तरी ते अंधश्रद्धेतच गुरफटलेले असतात. यावरुन शिक्षण कशाला म्हणायचं आणि शिक्षण का बरं घ्यायचं? हा प्रश्न त्याचेसमोर उभा होता. उच्चशिक्षीत अंधश्रद्धा याचा अर्थ देव दगड, मातीत ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 8
*********** ८ *************************** सृष्टीला शालार्थ आयडी घोटाळ्याची चिंता होती. तसे तिच्या नोकरीला तब्बल सात आठ झाले होते. तशी तिला नोकरीही उशिराच लागली होती. सृष्टीला लागलेली शालार्थ आयडी घोटाळ्याची चिंता. मोठमोठे अधिकारी पकडले जात होते. अशातच त्याची गाज शिक्षकांकडे फिरली. ज्यात सृष्टी सापडली. त्यातच तिची सुनावणी झाली व सुनावणीदरम्यान सृष्टी दोषी आढळली व तिची नोकरी गेली.परंतु तिला सारखं वाटत होतं, दोष आपला नाही. दोष आहे संस्थाचालकाचा. त्यांनी आपल्याला नोकरी दिली. हे खरं असलं तरी त्या नोकरीची मान्यता तिनं गैरव्यवहार करुन घ्या म्हटलेलं नाही. तसं संस्थाचालकानं तिला शाळेत घेतलं. त्याची दोन कारणं होती. ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 9
***************** ९ ************************** टेटची ती परिक्षा. ती येण्यापूर्वीच शाळेशाळेत गोंधळ होता. शाळाशाळांमध्ये शैक्षणिक गोंधळ माजला शिक्षकांना शासन सुखानं जगू देत नव्हतं. निव्वळ शासनच नाही तर खाजगी शाळेतील संस्थाचालकही सुखानं जगू देत नव्हता. तो देण म्हणून शिक्षकांच्या रकमेतून पैसे घेत होता. आपली गुंडगीरी दाखवत होता. ऑनलाईन कामानं तर शिक्षकांचं कंबरडं मोडलं होतं. त्यातच सरकार निवडणूक आणि इतर बऱ्याच गोष्टीची कामंही शिक्षकांच्या मागं लावत होते. जसा शाळेचा सृष्टीला त्रास होत होता. तसाच त्रास प्रभासलाही होत होता. त्यामुळंच सृष्टीच्या मनात जे विचार येत होते. तेच विचार प्रभासच्या मनात यायचे. एक दिवस अमेय प्रभासला जेव्हा भेटला. तेव्हा प्रभासनं शाळेबाबतची ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 10
****************** १० ******************* ती सरकारी नोकरी. तिचा त्रास सृष्टी व प्रभासलाही झाला होता, ते नोकरीवर आज त्याच सरकारी नोकरीच्या त्रासातून ते घरी बसले होते ऐन वेळी. नवीन सरकारच्या नियमानुसार ना त्यांना पेन्शन मिळत होती. त्यातच त्यांचे हाल हे बघण्यासारखे होते. ज्यावेळेस त्यांची नोकरी सुटली होती. त्यावेळेस त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत होती. कामाची एवढ्या वर्षापासून सवय नसल्यानं कोणतंही काम करावसं वाटत नव्हतं. त्यानंतर जवळ जो काही पैसा होता, तो पैसाही त्यांनी नोकरीवर असतांनाच नोकरी टिकविण्यासाठी खटले लढतांना खर्च केला होता. परंतु जेव्हा ते टेटची परिक्षा आली. तेव्हा टेटच्या न्यायालयीन आदेशानं जबरदस्तीनं निवृत्त झाले. तेव्हा जी ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 11
************ ११ ******************** प्रभास व सृष्टी भारत देशातील रहिवाशी. तसा नेपाळ हा शेजारील देश होता. अराजकतेच्या कारणावरुन संघर्ष झाला होता व नेपाळमधील सत्ताधारी असलेल्या लोकांची घरं नेपाळमधील जनतेनं जाळून टाकली होती. त्यातच नेपाळमधील सत्ताधारी लोकं मरणाच्या भीतीनं देश सोडून पळून गेले होते. त्यातच प्रभास व सृष्टीला वाटत होतं की नेपाळकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. भारताचीही सध्याची स्थिती तशीच आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात त्यांनी टेट परिक्षा आणली आहे. शिक्षकांचा रोजगार हिरावणे सुरु आहे. लोकांचाही रोजगार हिरावणे सुरु आहे. लोकांनाही कामधंदे नाहीत. हं, सरकार, मजूर, गोरगरीब लोकांना मोफत धान्य नक्कीच देतं. परंतु त्यातून लोकं आळशी बनत चालले ...अजून वाचा
सरकारी नोकरी - 12 ( अंतिम भाग )
********************** १२ ******************* ते आरक्षण..... आरक्षण होतं, नोकरीसाठी. राजकारण करण्यासाठी अन् शिक्षणासाठी. परंतु ते जरी असलं तरी प्रभास आणि सृष्टीनं त्यांची नोकरी जाताच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आपली मुलं शिकवली स्वतःच्याच पैशानं. शिक्षणाचंही शुल्क भरलं. कारण होतं समाधान. आत्मीक समाधान. ते समाधान की उद्या काळ गेल्यानंतर स्वतःला वाटेल व अभिमानानं सांगता येईल की मी स्वतःच्या पैशानं शिकवलं. त्यावेळेस आपली छातीही इंचभर वाढलेली असेल. तसंच त्यांना वाटत होतं की आपली मुलंही समाधान व्यक्त करतील. म्हणतील की आरक्षण होतं, परंतु आम्ही आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आम्ही स्वतःच शिकलो. आमच्या वडिलांनी स्वतःच त्यांच्या पैशानं शिकवलं. कुणासमोरही आमच्या ...अजून वाचा