1
सुख आणि सुखाचा देखावा
सुख आणि सुखाचा देखावाआजच्या काळात माणूस सुखी आहे की सुखी असल्याचा देखावा करतो आहे, असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण व्याख्या बदलत चालली आहे. पूर्वी सुख म्हणजे समाधान, शांतता, कुटुंबातील जिव्हाळा, माणसांमधील आपुलकी आणि मनाला मिळणारा आनंद असे मानले जायचे. आज मात्र सुखाचे मोजमाप पैसा, प्रतिष्ठा, महागड्या वस्तू, आलिशान घरे, परदेशवारी आणि समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी यावर होऊ लागले आहे. खरे सुख आणि सुखाचा देखावा यांच्यातील सीमारेषा हळूहळू पुसट होत चालली आहे.आज प्रत्येकाला आपले आयुष्य इतरांपेक्षा सुंदर, समृद्ध आणि आनंदी असल्याचे दाखवायचे आहे. कुठे फिरायला गेलो, काय खाल्ले, कोणती खरेदी केली, कोणत्या समारंभाला उपस्थित राहिलो, याचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकण्याची जणू ...अजून वाचा