कथा एका राजाच्या मुलाबद्दल आहे, जो लाडामुळे बिघडला आहे. राजा आणि राणी त्याला सुधारण्यासाठी राज्यातून हाकलण्याचा निर्णय घेतात. राणी या विचाराने दु:खी होते, परंतु राजा ठाम असतो. राजपुत्र आईकडून आशीर्वाद घेऊन निघतो, त्याच्यासोबत लाडू आहेत. प्रवासात, त्याला लाडू फोडताना एक रत्न सापडतो, जो त्याला आनंद देतो आणि आईची चिंता मनात येते. एक हरिणी पाहून, तो तिच्यावर बाण चलवण्याचा विचार करतो, पण आईची आठवण आल्याने त्याला दया येते आणि तो बाण परत ठेवतो. पुढे जात असताना, त्याला एक साधी, निष्पाप स्त्री भेटते, जी त्याला सांगते की ती त्याची बहिण होऊ इच्छिते. कथा राजपुत्राच्या अंतर्मुखतेची आणि त्याच्या मूल्यांची शिकवण देते, जिथे तो आईच्या प्रेमाचा आणि कुटुंबाच्या महत्त्वाचा अनुभव घेतो.
सुंदर कथा - 2
Sane Guruji
द्वारा
मराठी सामाजिक कथा
5k Downloads
8.7k Views
वर्णन
एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगितला. आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर! ती रडत म्हणाली. तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे. तो म्हणाला. राणी काय करणार, काय बोलणार? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये! तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा