आई-बापाचे उपकार कदाचित या जगात तो परमेश्वर हि फेडू शकत नाही. आपण तर एक साधारण माणूस आहोत. आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात आणि आपल्या मुला-बाळांना मोठे करतात, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवता फक्त सुखाने, आनंदाने राहण्याचे स्वप्न ते पाहतात. पण ज्यावेळी त्यांची ती स्वप्न अशाप्रकारे कोलमडून पडतात की पुन्हा कोणाचा आधार ते घेऊ शकत नाही. त्यावेळीची त्यांची हि अवस्था कशी झाली का झाली ते कोणत वादळ होत की, ज्याने त्यांच स्वप्न, आनंद आणि सुख हिरावून घेतले याचे उत्तर कदाचित त्यांच्याकडे पण नसते. अशाच एका प्रसंगरुपी वादळाचे वर्णन मी करणार आहे.