आमची अमेरिकेची वारी

(17)
  • 14.1k
  • 9
  • 3.9k

, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आमच्या ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग विमानाने रनवे'वर धावण्यास सुरूवात केली. विमानतळाचे दिवे भराभर मागे टाकत विमानाने वेग घेतला. त्याआधी विमानाच्या संबधात सुरक्षीततेचे उपाय, सिटबेल्ट बांधण्याच्या सुचना, पायलट व क्रू यांची नावे, आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी, इत्यादी बाबत सूचना करण्यात आल्या. आम्हांला विमानात खिडकीजवळची जागा मिळाली होती. माझा व रजनीचा हा पहिलाच विमान प्रवास होता