कथा - तडजोड ----------------------------------------- भारती आणि विकास यांच्यातील संबंध अलीकडच्या काही दिवसांपासून ताणलेले आहेत " ही गोष्ट जाणवणारी असली तरी , त्या दोघांच्या वागण्या-बोलण्यातून "आमच्यात सगळं सुरळीत आहे ", असेच दिसत असे. विकास तसा माझा जुना आणि सहवासातील मित्र असल्यामुळे त्याच्याबद्दल माझे अंदाज काल्पनिक असणार नाही " एव्हढी खात्री तर आमच्या मित्राना आणि परिवारातील सर्वांनाच होती.. " चेहरे आणि मुखवटे " याचे नाते तसे दोन मित्रांचे असते "असे मला नेहमीच वाटत आलेले आहे ,रोजचे जगणे असो वा आयुष्य -प्रवास असो " चेहेर्यावर मुखवटे चढवूनच माणूस वावरत असतो, वागत असतो". असे करणे म्हणजे मोठ्ठा गुन्हा आहे" असेही मुळीच नाही