माझ्या गावातील आठवणी

  • 15.4k
  • 1
  • 2.9k

वाचकहो,आपण नेहमीचे जीवन जगतांना कधी-कधी थकून जातो आणि कंटाळवाणे वाटायला लागते व आपले मन आपल्या लहानपणीच्या जीवनात डोकावते. अशा वेळेस जे लहानपणी जीवन जगलो त्याचा एक चलचित्रपट मनात नकळत सुरु होतो परंतु जेंव्हा वास्तवातले पुन्हा जीवन सुरु होते तेंव्हा हा चित्रपट आठवणींच्या पडद्याआड जातो. तो कायमचा स्मुर्तीतून निघून जाऊ नये या साठी लो कायम स्वरूपी लिहून ठेवणे हे चांगले असते. त्याच अनुषंगाने माझ्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकात लिहल्या आहेत. जीवनात अशा काही व्यक्ती मिळतात कि त्यांनी केलेल्या मायेचा वर्षाव आपल्या मनात त्यांची कायम आठवण ठेवून जातो.ती व्यक्ती जिवंत असो अथवा मृत पण आपल्या मनात सदैव ती आठवणीरूपात सतत राहते.अशीच माझी माहुलीची दादी.आता दादीला मरुन ५ वर्ष झाले तरी त्यांच्या आठवणींचा ठेवा माझ्या मनात आहे.कॉलेज मध्ये कामे नसतांना मला दादीबद्धल लिहावेसे वाटले व मनातल्या आठवणींचा ठेवा सहजच लोकांनी वाचावा म्हणून लिहायला घेतला कि जेणेकरून त्या आठवणी मला पुन्हा उजाळा देता येईल.