बाबांच आईपण

  • 7k
  • 1
  • 1.3k

*बाबांचं आईपण*आजही आठवतो तीला  १८ जून ९५ चा रविवार.सकाळचे सात वाजले होते.बेटा खुप डोकं दुखतय गं!थोडं डोकं दाबुन देते का? म्हणून मारलेली आजारी आईची हाक.तीने आईचं डोकं मांडीवर घेतलं अनं डोकं दाबते तोच आईचे प्रश्न सुरू झाले.मला भेटायला आज काका येणार होता ना?आला का नाही गं?शेवटचा श्वास मोजणा-या आईला आता सगळी उत्तर होकारातच द्यायची म्हणून हो निघालाय येईलच १०वा.असं सांगून तेवढ्या पुरती वेळ तीने मारून नेली.मुला प्रमाणे धाकट्या दिरावर प्रेम करणारी माऊली दिराची वाट बघत होती.एक काका शिक्षक रविवारी शाळेला सुट्टी असूनही वहिनींना भेटायचं म्हणून काकूला घेऊन आला.काकाला बघताच तु ऊठ त्यांना चहा नाष्टा दे म्हणून आग्रह करणा-या आईचा आग्रह