एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास 

  • 8.4k
  • 3
  • 3.3k

------------------- एक पत्र 'अटल' व्यक्तीमत्वास ! ---------- आदरणीय अटलजी, साष्टांग नमस्कार ! तुम्हाला पत्र लिहिताना 'काय लिहू ? कसे लिहू? कशी सुरुवात करू?' अशी अवस्था झाली आहे. शब्द इकडे तिकडे झाले असतील परंतु तुम्ही अशीच भाषणाची सुरुवात करीत असत. तसेच काही प्रश्न मनालाच विचारून मी लिहितो आहे. मला आठवते, तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करताना अनेक वेळा 'क्या बोलू? कैसे बोलू? कहाँ से शुरूआत करू?' अशा आशयाचे प्रश्न विचारून करीत असत. अटलजी, खरे सांगू का, मलाच काय परंतु भारतातील कोट्यवधी जनतेला तुम्ही आमच्यामधून कायमचे निघून गेला आहात असे वाटतच नाही. घरातील एखादी व्यक्ती सोडून गेली यावर जसा